उपजिल्हा रुग्णालय करमाळा मधील बेजबाबदार डॉक्टर यांच्यावर तात्काळ कारवाई करा अन्यथा आंदोलन  सिव्हिल सर्जन सोलापूर यांना निवेदन यशपाल कांबळे

 करमाळा प्रतिनिधी

निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 4/7/2023 रोजी पोटात कळ येत असल्या कारणाने अश्विनी सचिन उदागे हे उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे आले त्यांच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या व डॉक्टरांनी हस्तलिखित पत्रात 7.5 एचबी इतके

रक्त आहे व सिजर करावे लागेल रक्ताच्या बाटल्या लागतील व त्यांना सोलापूरला रेफर केल्याचे हस्तलिखित पत्र दिले. पेशंट ची तब्येत व्यवस्थित नसल्याकारणाने  पत्र घेतले पण अश्विनी सचिन उदागे यांना त्यांच्या घरच्यांनी अक्षय हॉस्पिटल

करमाळा (डॉ. पुंडे) येथे ऍडमिट केले.  तिथे रक्त चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 9.5 असे एचबी आले. दिनांक 5/7/ 2023 रोजी त्याच दिवशी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे झालेले डिजिटल चाचणी आम्ही पाहिली (महा लॅब्स महाराष्ट्र शासनाचे निशुल्क प्रयोगशाळा) त्यामध्ये 8.5 एचबी दि. 5/7/ 2023 रोजी च्या रिपोर्ट मध्ये आहे.

दि. 5/7/2023 रोजी अक्षय हॉस्पिटल (डॉ. पुंडे) येथे अश्विनी सचिन उदागे ह्या पहाटे 5:27 AM प्रसव झाल्या.

महत्वाची बाब म्हणजे डिलिव्हरी नॉर्मल झाली. महत्त्वाचा प्रश्न असा आहे कि, उपजिल्हा  रुग्णालय जनतेच्या जीवाशी खेळते आहे काय?

सदरील घटना अतिशय निंदनीय आहे याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. आपण या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल करावा.

अन्यथा जनतेच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी (आठवले गट) जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल

* टीप:- सोबत सदर प्रकरणाची सर्व कागदपत्रे रक्त चाचण्या पुरावे जोडलेले आहेत

1) मा. रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार

2) मा. डॉ. मनसुख मांडवीया साहेब केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री भारत सरकार

3) मा. तानाजी सावंत साहेब सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य

4) मा. जिल्हाधिकारी साहेब, सोलापूर

5) मा. पोलीस अधीक्षक साहेब, सोलापूर

6) मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, करमाळा

7) मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय, करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *