
महाराष्ट्र धर्म संकटात संभाजी ब्रिगेड मैदानात… प्रवक्ते हर्षल बागल यांचा भाजपवर हल्लाबोल
कुर्डूवाडी प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म हा महाराष्ट्र धर्म होता, स्वराज्य धर्म होता. महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून शिवराय आणि शंभू राजांचा लढा होता. त्यानंतरच्या काळात यशवंतराव चव्हाण यांचा लढा देखील महाराष्ट्र धर्मासाठी

होता. बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्र वाचवण्यासाठी दिल्लीला टक्कर द्यायला मागेपुढे पाहत नव्हते, दिल्लीवरून महाराष्ट्रावर कितीतरी आक्रमण आली तरी महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या नेत्यांनी कधीही गुलामी पत्करली नाही, स्वीकारली नाही. म्हणून महाराष्ट्र धर्म सुखरूप राहिला. तोडा, फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती आहे ती भाजपने अवलंब केली.

महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष फोडायचे आणि राज्य निर्माण करायचं ही त्यांची सवय आहे. नागरिक त्याला कंटाळले आहेत. जर महाराष्ट्र वाचवायचा असेल महाराष्ट्रातली शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर ही पुरोगामी चळवळ वाचवायची असेल, इतिहास वाचवायचा असेल तर आगामी काळात भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करा असा हल्लाबोल. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते व्याख्याते हर्षल बागल यांनी केला आहे.

‘महाराष्ट्र धर्म संकटात संभाजी ब्रिगेड मैदानात’ असे ब्रीद वाक्य घेऊन संभाजी ब्रिगेड भाजपला उत्तर देईल, छत्रपती शिवरायांचे घर देखील यांच्याच पूर्वजांनी फोडले होते, इंग्रजांबरोबर सत्ता स्थापनेचा प्रस्ताव यांच्याच पूर्वजांनी दिला होता, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे पाप यांनीच केलं आणि अगदी काल परवा राष्ट्रवादी पक्ष फोडून फोडा, तोडा आणि

राज्य करा ही नीती देखील यांचीच आहे. महाराष्ट्राला उध्वस्त करणे, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणे हा यांचा उद्योग आहे. अगदी पूर्वीपासून भाजप हा महाराष्ट्र धर्माच्या विरोधात राहिलेला पक्ष असून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी भाजपला लांब ठेवले पाहिजे असेही प्रवक्ते हर्षल बागल म्हणाले आहेत.

चौकट
भाजप हा शेठजी भटजींचा पक्ष
भाजपला शिवराय, फुले, आंबेडकर विचारधारा चालत नाही. मराठा नेते देखील चालत नाहीत, भाजप हा केंद्रामध्ये शेठजी ला घेऊन बसला आहे. तर राज्यामध्ये दंगली घडवायला भटजीला सोडले आहे. एका सर्वसामान्य घरातील व्यक्ती केंद्रात मंत्री होतो, भविष्यात तो राज्याचा मुख्यमंत्री होईल म्हणून गोपीनाथ मुंडे सारख्या व्यक्तीला बाजूला केले जाते हा इतिहास

भाजपमध्ये आहे. भाजपमध्ये दोन्ही छत्रपतींची जागा काय आहे याचं देखील उत्तर पक्षाने दिला पाहिजे. बहुजनांचा पक्ष कधीच होऊ शकत नाही. शेठजी आणि भटजीचाच तो पक्ष कायम राहील त्यामुळे अशा पक्षाला मराठा बहुजनांनी नाकारले पाहिजे असे हे हर्षल बागल यांनी म्हटले आहे.