
देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारी मोदी सरकारची ९ वर्षातली कामगिरी…. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
करमाळा प्रतिनिधी
मौजे पडसाळी ता. माढा येथे भारतीय जनता पार्टीचे मोदी @९ लाभार्थी अभियान उत्साही वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष भाजपा तथा आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पडसाळी गावचे सरपंच योगेश पाटील यांनी करताना पडसाळी गावातील विविध समस्यांचा पाढा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समोर मांडला. मागील २५ वर्षात गावावर स्थानिक सत्ताधार्यांनी प्रत्येक गोष्टीत अन्याय केला. सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासुन गावाला जाणीवपूर्वक टाळलं. मागील १ वर्षात भाजपाच्या

माध्यमातुन जवळपास १ कोटी ५० लाख रूपयांचा निधी खेचून आणला. भविष्यात भारतीय जनता पार्टीच्या मदतीने पाण्यासाठी शाश्वत योजना करून गावातील पाझर तलाव भरून घेणे गरजेचे असल्याचे सरपंच योगेश पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भविष्यात माढा तालुक्यातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबध्द राहणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातुन पडसाळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे. सीना माढा योजनेत राहिलेल्या गावांचा समावेश करून तातडीने कामे मार्गी लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, माढा लोकसभा मतदार संघांतील प्रत्येक गावाला निधी दिला आहे. मागचे खासदार एकदा निवडुन गेल्यावर परत मतदारसंघाकडे फिरकलेच नाहीत. मी तसे न करता प्रत्येकाला न्याय दिला आहे. पडसाळी गावचा विकास करण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून सर्वांगीण विकास करणार आहे.

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोदी सरकारची ९ वर्षातील कामे सर्वांसमोर मांडली. प्रत्येक निर्णय घेताना देशातील सर्व सामान्य जनता डोळ्यासमोर ठेऊन लोकांना जे गरजेचे आणि सोयीचे निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातुन प्रत्येक शेतकर्याला २००० रूपये चालु केले त्याच धर्तीवर राज्यसरकारने

प्रत्येक शेतकर्याला २००० रूपये चालु केले आहेत. जल जीवन मिशनच्या माध्यमातुन देशातील प्रत्येक गावाला निधी देऊन हर घर नल हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवलं. देशातल्या शेवटच्या घटकाचा विचार करून ध्येय धोरण देशात रस्त्याचे जाळे निर्माण केले, भविष्यात जगाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपला भारत देश करेल त्या दृष्टीने वाटचाल करत असताना विकसित देशाच्या G20 चे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेतृत्व करत आहेत. तालुक्याचा आमदार बदला तालुक्याचा विकास डबल इंजिनच्या गतीने होईल.