एमपीएससी परीक्षेमध्ये श्रीकांत लक्ष्मण गोडगे यांची निवड झाल्याबद्दल पूर्व सोगाव ग्रामस्थांतर्फे भव्य मिरवणूक व सत्कार सोहळा संपन्न

करमाळा प्रतिनिधी

श्रीकांत लक्ष्मण गोडगे यांची एमपीएससी मध्ये निवड झाल्याबद्दल पूर्व सोगाव ग्रामस्थांतर्फे भव्य मिरवणूक व सत्कार सोहळा घेण्यात आला. श्रीकांत गोडगे यांचे शिक्षण इयत्ता पहिली ते चौथी जि. प. प्रा. शाळा पूर्व सोगाव येथे झाले आणि

पाचवी ते बारावी महात्मा गांधी उच्च व माध्यमिक विद्यालय, कर्जत येथे झाले. तसेच डिग्री बी.एस्सी.  अॅग्री लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा सोलापूर येथे पूर्ण झाले.

श्रीकांत यांनी 2015 पासून पुढे एमपीएससीची परीक्षा दिली. 2016 मध्ये पूर्व परीक्षा पास झाले व मुख्य परीक्षा नापास झाले तसेच परत 2017 मध्ये पूर्व परीक्षा पास व मुख्य परीक्षा नापास झाले. 2018 मध्ये पूर्व परीक्षा पास करून मुख्य परीक्षा पास

झाले आणि फिजिकल उडी फॉल गेल्यामुळे 15 मार्क गेले व 100 पैकी 85 मिळाले आणि फायनल रिझल्ट 1 मार्क ने गेला तरी त्यांनी हार मानली नाही व 2020 मध्ये पूर्व परीक्षा पास, मुख्य परीक्षा पास, फिजिकल पास होऊन मुलाखत होऊन राज्यात 91 व्या रँक ने पास झाले आणि त्यांनी यशाचे सर्व श्रेय त्यांच्या आई-वडिलांना व मोठ्या भावाला दिले आहे.

सत्कार करण्यावेळी दिग्विजय बागल (चेअरमन), श्रीकांत चे वडील लक्ष्मण (अण्णा) गोडगे (संचालक आदिनाथ सहकारी साखर कारखाना) यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *