करमाळा प्रतिनिधी

आज निंभोरे ग्रामपंचायतच्या वतीने तहसीलदार तहसील कार्यालय, करमाळा यांना दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी निंभोरे व परिसरात सोडणेबाबत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मौजे निंभोरे ता. करमाळा येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करणेबाबतचा प्रस्ताव आपल्या कार्यालयाकडे देण्यात आला आहे.

 सध्या आषाढी वारी सुरु आहे. गावातून दिंडी व वारकरी खुप मोठ्या प्रमाणात जातात. परंतु निंभोरे व परिसरात जवळपास तीन ते चार किमीच्या अंतरावर टँकर भरणेसाठी शासकीय व खाजगी श्रोतांना पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे टँकर मंजूर झाला तरी टँकर भरण्याची अडचण निर्माण होणार आहे.

त्यावर उपाय म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी निंभोरे पाणी पुरवठा विहिरीच्या पाझर तलावात सोडल्यास निंभोरे व वाडी वस्तीचा, परिसरातील गावांचा मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

या पत्राची प्रत गटविकास अधिकारी पंचायत समिती करमाळा, कार्यकारी अभियंता सोलापूर पाटबंधारे विभाग तसेच उपविभागीय अधिकारी, कुकडी डावा कालवा उपविभाग क्र. 12, करमाळा यांना देण्यात आली आहे.

यावेळी ग्रामपंचायत निंभोरेचे सरपंच रविंद्र वळेकर आणि सामाजिक कार्यकर्ते महेश वाघमारे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *