
श्री संत गजानन महाराज दिंडी मधील वारकरी बांधवाची कुर्डुवाडी शहर नाभिक समाजाच्या वतीने मोफत दाढी कटींग सेवा
करमाळा प्रतिनिधी
कुर्डुवाडी शहर नाभिक समाजाच्या वतीने श्री संत गजानन महाराज दिंडी शेगाव मधील वारकरी बांधवाची मोफत दाढी कटींग

सेवा हा ऊपक्रम हा कार्यक्रम घेण्यात आला.
या ऊपक्रमाचा शुभारंभ डाॅ.जयंत करंदीकर साहेब यांचे हस्ते करण्यात आला.या वेळी मिलींद कर्हाडे,संतोष पवार ऊपस्थीत होते.
या वेळी बोलताना नाभिक संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर म्हणाले की,दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा आदर्श ऊपक्रम कुर्डुवाडीतील नाभिक समाजाने केला आहे.श्री संत सेना महाराज हे वारकरी बांधवाची दाढी कटींग करत असताना

तेथील राजाचे बोलावने संत सेना महाराजांना आले.पण वारकरी बांधवाची दाढी कटींग करत असल्यामुळे ते राजा पर्यंत जाऊ शकले नाही.त्यामुळे राजा चिडला.त्या राजाने संत सेना महाराजांना पकडुन आणण्याचे सैनिकांना सांगीतले.त्यावेळी साक्षात विठ्ठलाने श्री संत सेना महाराजाचे रुप घेऊन राजाची हजामत केली हा इतीहास आहे.

असे या वेळी सांगीतले.
या ऊपक्रमात ५२७ वारकरी बांधवानी मोफत
दाढी कटींग या सेवेचा लाभ घेतला.
या ऊपक्रमासाठी सुधिर भाऊ गाडेकर, बापु दळवी, रामदास राऊत, कुमार दळवी, महेश जाधव, पोपट गाडेकर, संतोष गाडेकर,

वैजिनाथ राऊत, महेश जाधव ,ईश्वर गाडेकर, बापु वाघमारे, महादेव गाडेकर, ऊमेश सुर्वेकर, सोमनाथ राऊत, राजु सावंत, शिवतेज गाडेकर, अभिजीत कोन्हाळे पाटील यांचेसह नाभिक समाज बांधवांनी परीश्रम घेतले.

या ऊपक्रमा नंतर संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांचे कडुन या ऊपक्रमाबद्दल सर्व नाभिक समाजबांधवाचा सत्कार करण्यात आला.
