श्री नृत्यशैली भरतनाट्यम् नृत्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

करमाळा प्रतिनिधी

गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे. या निमित्ताने नृत्यशैली भरतनाट्यम् नृत्यालयात गुरुपौर्णिमा नुकतीच साजरी करण्यात आली.

 सदर कार्यक्रमात गुरुवर्य व संचालिका मितवा श्रीवास्तव तसेच पालक अश्विनी बागडे व अर्चना लोकरे आर्किटेक्ट अंकिता आहुजा व साहित्यिका अंजली श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत श्री नटराज मूर्ती चे पूजन करण्यात आले.

नृत्यालयातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

जान्हवी लोकरे, राजलक्ष्मी दोशी,आरोही घुमरे, श्रावणी बागडे, राजेश्वरी जगताप, धनश्री जमदाडे, वीरा शिंदे,या विद्यार्थ्यांनीनी

भरतनाट्यम् शैलीतून गुरू वंदना सादर केली.

 आंगिकम् भुवनम् यस्य या संस्कृत श्लोकाने कार्यक्रमाची सांगता झाली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *