टँक्टर चोरीची रक्कम अधिकाऱ्यांकडून वसूल करावी – मा. नगरसेविका माने

करमाळा प्रतिनिधी

करमाळा नगर परिषदेच्या ट्रॅक्टर चोरीला गेला आहे त्याची रक्कम संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल करावी अशी मागणी माजी नगरसेविका राजश्री माने यांनी केली आहे.

गेले पंधरा-वीस दिवस होऊन गेले तरीसुद्धा ट्रॅक्टर चोरीचा अजून तपास लागला नाही. साधा मोबाईल चोरीला गेला तर त्याचा तपास त्वरित करून  शोध लागला जातो. करमाळा नगर परिषदेचे ट्रॅक्टर ट्रॉली एवढी मोठी वस्तू चोरीला गेली तरी त्याचा शोध

अद्दाप लागत नाही ही मोठी शोकांतिका आहे. नगरपरिषदेच्या प्रशासनाचा गलथान कारभारामुळे संस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. या मध्ये नगर परिषदेचे संबधीत अधिकारी पाठपुरावा करण्यास  कमी पडले कि पोलीस खाते शोध घेण्यास कमी पडले.

याचा नगर परिषदेने खुलासा करावा. अन्यथा झालेल्या नुकसानीची रक्कम संस्थेचे अधिकारी यांच्याकडूनच वसूल करून घ्यावी अशी मागणी  माजी नगरसेविका माने यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *