
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत गुरुपौर्णिमे दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप-
करमाळा प्रतिनिधी

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुपौर्णिमे दिवशी नागेशजी दामोदरे (एस.एम.सी. सदस्य) यांनी स्वतःची

मुलगी कृतिका हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल

व वह्यांचे वाटप केले. पूजा दामोदरे, माया शिंदे, रावडे मॅडम, अडसूळ मॅडम व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. शाहू महाराजांनी

दिन दलितांची व गोरगरिबांची कामे केली. आरक्षणाचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. आपणही त्यांचा आदर्श घ्यावा. असे

मनोगत नागेशजी दामोदरे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक यांनी केले व आभार दिपक जाधव सर यांनी मानले.
