करमाळा भारतीय दूर संचार निगम लिमिटेड चा अजब कारभार (वरिष्ठ अधिकारी म्हणतायत खाजगी कनेक्शन घ्या) – प्रियांका गायकवाड

करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील BSNL कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालू असुन कोणतेही अधिकारी हे कार्यालयात उपलब्ध नसतात. शहरातील दूरध्वनी सेवा वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांना तसेच शासकीय निमशासकीय कार्यालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, करमाळा येथील कनिष्ठ अभियंता मोटा साहेब हे रजेवर गेले असून करमाळा येथील कारभार हा वाऱ्यावर सोडल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी कोकणे साहेब यांच्याशी नागरिकांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनीही याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच BSNL सोडुन खाजगी सेवा घेण्याबाबत वरिष्ठ

अधिकारी नागरिकांना सांगत आहेत. जर शासकीय अधिकारीच शासनाची सेवा बंद करण्यासाठी सांगत असतील तर त्यांची सुद्धा शासकीय सेवा, पगार ई. बंद करावे, अशी मागणी यावेळी गायकवाड यांनी केली. तसेच कंत्राटी कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांनी ही काम बंद आंदोलन केले आहे. यासाठी संबधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर सक्त कारवाई होण्यासाठी वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे हि गायकवाड यांनी सांगितले.

याबाबत लवकरात लवकर सेवा सुरळीत न केल्यास शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्त्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *