
केतुर च्या कार्यक्रमाला सविता देवी राजे भोसले गैरहजर, नाराजीच्या चर्चेला पुष्टी
करमाळा प्रतिनिधी
केतुर नंबर एक येथे माजी आमदार नारायण पाटील यांचे उपस्थितीत जल जीवन योजनेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर जिल्हा परिषद सदस्य व मोहिते पाटील गटाच्या कट्टर समर्थक सविता देवी राजे भोसले व केमचे माजी सरपंच अजित दादा तळेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून नाव होते मात्र या दोन्ही नेते मंडळींनी या कार्यक्रमाला अनुपस्थिती दाखवल्यामुळे भोसले व तळेकर यांच्यावर माजी आमदार नारायण पाटील नाराज असल्याचा वृत्ताला पुष्टी मिळाली आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य सविता देवी राजे भोसले यांना पॅनल उभा करून निवडणूक लढवायची होती. मात्र या निवडणुकीत पाहिजे तसे सहकार्य किंवा पाठिंबा माजी आमदार नारायण पाटील यांनी न दिल्यामुळे सविता देवी राजे भोसले नारायण पाटील यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे.

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून माजी आमदार नारायण पाटील यांनी बागल गटाला सॉफ्ट कॉर्नर दिल्याची चर्चा असून तसे त्यांच्या कृतीतून दिसून आले आहे. ही भूमिका सविता देवी राजे भोसले व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना पटलेली नाही. सविता देवी राजे भोसले विधानसभेचे उमेदवार होऊ शकतात. मोहिते पाटील गटाचा त्यांना पाठिंबा आहे.

सविता देवी राजेभोसले तालुकास्तरीय राजकारणात महिला नेत्या म्हणून येऊ नये, अशी भूमिका तालुक्यातील प्रमुख विद्यमान नेते मंडळाची आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांना आमदार करण्यात सविता देवी राजे भोसले यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र नंतरच्या राजकीय काळात त्यांना कोणत्याही ठिकाणी मोठी संधी नारायण पाटील तर्फे मिळाली नाही. जिंती ग्रामपंचायत मध्ये सविता देवी राजे भोसले यांच्या मुलाला पराभव स्वीकारावा लागला.

सविता देवी राजे भोसले यांचा राजकीय पवित्र बदलणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मात्र मकाईची निवडणूक होऊन पंधरा दिवस उलटले तरी अद्याप सविता देवी राजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
मकाई कारखान्याच्या निवडणुकीनंतर आपल्या सोशल अकाउंट वर राजकारणात कुणी कायमचा शत्रू व कायमचा मित्र नसतो, असा स्टेटस ठेवून सविता देवी राजे भोसले यांनी नेमका इशारा कोणाला दिला होता याचा उलगड आता होऊ लागला आहे.
