
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ९ वा आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा …
करमाळा प्रतिनिधी
दि .२१ करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशंवतराव चव्हाण महाविद्यालयात ९ वा आंतरराष्ट्रीय योगदिन

उत्साहात साजरा करण्यात आला . आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे यांच्या संकल्पनेतून योगा करण्यासाठी शिक्षकांना मॅटचे वाटप करण्यात आले .यावेळी एन .सी.सी. कॅडेट गोरक्ष लोंढे व कॅडेट धनश्री पवार यांनी योगाची प्रात्यक्षिके करुन दाखवली . या याप्रसंगी योगा करताना विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी

घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एल.बी.पाटील,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, लेफ्टनंट डॉ . विजया गायकवाड,माजी प्राचार्य नागेश माने,करमाळ्यातील प्रसिद्ध व्यापारी रितेश

कटारिया, वरिष्ठ शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ .अतुल लाकडे,कनिष्ठ शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा .राम काळे,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,एन .सी.सी कॅडेट आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने

उपस्थित होते .या योगा दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे वरिष्ठ विभागाचे फिजिकल डायरेक्ट डॉ.अतुल लकडे स्वागत करून.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार व्यक्त केले.
