अर्बन बँकेचे कर्ज फेड योजनेचे शेवटचे दहा दिवस

करमाळा प्रतिनिधी

दि. करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड करमाळा. (एक रक्कमी कर्ज फेड योजनेचे शेवटचे दहा दिवस) एक रकमी

कर्ज फेड योजना बँकेने स्वीकारली असल्याने आज अखेर दोन कोटीची एकूण वसुली झालेली आहे. या योजनेअंतर्गत 110 कर्ज खाती बंद झालेले आहेत. बँकेची थकबाकी कमी व्हावी व थकीत कर्जदारांना आपली थकीत रक्कम सहज भरता यावी यासाठी बँकेचे प्रशासक दिलीप तिजोरे यांनी शासनाची एक रकमी कर्ज फेड योजना स्वीकारली या योजनेस कर्जदारांनी भरभरून

प्रतिसाद दिलेला असून सदर योजनेची मुदत दिनांक 30/06/2023 अखेर संपुष्टात येत आहे. ज्या कर्जदारांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा कर्जदारांना प्रशासक दिलीप तिजोरे यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे की सदरची योजना

कर्जदाराच्या फायद्याची असून बँके योजनेनुसार कर्जदारांच्या थकबाकी वर सहा टक्क्याने व्याजाची आकारणी केलेली जात आहे त्यामुळे कर्जदारांच्या थकबाकीत भरपूर सूट मिळत आहे. या योजनेची मुदत 30-06/2023 रोजी संपत असल्याने लवकरात लवकर उर्वरित कर्जदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेची मुदत संपताच शिल्लक कर्जदारांवर कायदेशीर

कारवाई करून त्यांच्या जंगम व स्थावर मालमत्ता जप्त केल्या जातील व त्यांचा जाहीर लिलाव करून थकबाकीची रक्कम वसूल केली जाईल असे आव्हान बँकेचे प्रशासक दिलीप तिजोरे यांनी केलेले आहे स्कीमच्या माध्यमातून थकीत कर्जदारांना आपली थकीत रक्कम भरण्याची मोठ्या प्रमाणात संधी बँकेने उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *