महिलांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा (शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आवाहन) – प्रियांका गायकवाड

करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या उन्नतीसाठी विविध कल्याणकारी योजना

राबविल्या असून त्याचा महाराष्ट्रातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिना निमीत्त शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी केले.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या

सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,  विद्यार्थांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून विविध कल्याणकारी योजना शिवसेनेने राबविल्या आहेत. त्याचा लाभ प्रत्येक होतकरू विद्यार्थ्यांनी घ्यावा. आजचा विद्यार्थी उद्याच्या उज्वल भारताचे भविष्य घडविणारा असल्याने त्यांनी शैक्षणीक दृष्ट्या मागासलेले राहू नये. शैक्षणीक धोरणाबाबत कोणतीही अडचण असल्यास शासनस्तरावरून पाठपुरावा करून संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख

महेश चिवटे यांच्या प्रयत्नातून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु. करमाळा तालुक्यातील महिलांनी विविध योजनेचे लाभ घेण्यासाठी किल्ला वेस करमाळा येथील संपर्क कार्यालयात  संपर्क साधावा असे आवाहन यावेळी गायकवाड यांनी केले.

तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शिवसेना पक्ष हा महिलांच्या वैद्यकीय, सामाजिक आर्थिक, इ. सर्वांगीण विकास साधणारा पक्ष असल्याने आज अनेक लोकांचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रवेश होत आहेत. आज महाराष्ट्राच्या

कानाकोपऱ्यात जाऊन, प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन व वेळप्रसंगी रस्ते, नालेसफाई इत्यादी प्रत्यक्ष पाहणी करणारे मुख्यमंत्री आज पर्यंत महाराष्ट्राने पाहिले नव्हते त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही शिवसैनिक ही महाराष्ट्रातील प्रत्येक घटका पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहोत. लवकरच मुख्यमंत्र्यांचा महत्वकांक्षी कार्यक्रम शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वीपणे व ना भूतो ना भविष्याती असा मोठा प्रमाणात राबविण्याचा आमचा मानस असल्याचे यावेळी गायकवाड यांनी

सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *