चिमुकल्या विद्यार्थी परींच्या आगमनाने मुली नं.१ शाळेचे प्रांगण फुलले

करमाळा प्रतिनिधी

शाळेच्या पहिल्याच दिवशी शासन निर्णयानुसार शाळा पूर्व तयारी अंतर्गत कै.साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं.१ नगर परिषद, करमाळा या शाळेत इयत्ता पहिलीतील नवीन प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनीचा प्रवेश उत्सव कार्यक्रमात गुलाबपुष्प, चॉकलेट, फुगे देवून फुलांचा वर्षाव करून मोठ्या उत्साहात स्वागत केले.

प्रवेश उत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील सर तर प्रमुख उपस्थित मुख्याध्यापक दयानंद चौधरी सर, उपाध्यक्षा भाग्यश्री फंड, सदस्य सचिन काळे, माधुरी पवार मॅडम व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थिनींनी मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली. मुलींच्या स्वागतासाठी शाळेने केलेली फुग्याची, कार्टून, रांगोळी, फुलांची आकर्षक सजावट केल्याने शाळेचा पहिला दिवस आनंददायी व उत्साही झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दयानंद चौधरी सर यांनी केले तर सूत्रसंचालन संध्या शिंदे मॅडम यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार मोनिका चौधरी मॅडम यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका सुवर्णा वेळापुरे मॅडम, सुनिता क्षीरसागर मॅडम, तृप्ती बेडकुते मॅडम, भाग्यश्री पिसे मॅडम, भालचंद्र निमगिरे सर, रमेश नामदे सर, निलेश धर्माधिकारी यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *