प्रणाली मोहोळकरचा काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे

करमाळा प्रतिनिधी

मोरवड ता.करमाळा येथील प्रणाली पोपट मोहोळकर हिने इयत्ता १२ वी सायन्स मध्ये 91.83 % मार्क मिळवुन नेत्रदिपक यशसंपादन केल्याबद्दल करमाळा तालुका काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात

आला. प्रणाली हीने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतुन शिक्षण घेत असताना हे यश संपादन केले. परिक्षेच्या कांही महीने अगोदरच वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अश्या परिस्थितीतही करमाळा येथील महात्मा गांधी

विद्यालयात इयत्ता १२ वी चे  सायन्स मधुन शिक्षण पुर्ण केले. इंजिनियर क्षेत्रांमधुन पुढील शिक्षण करुन UPSC  मध्ये स्वतःचे करिअर करण्याचा प्रणालीचे ध्येय असुन भविष्यात कसलीही मदत लागली तरी आपण करण्यासाठी तयार असल्याचे

आश्वासन प्रतापराव जगताप यांनी तीच्या कुटुंबीयांना दिले. यावेळी काँग्रेस युवक चे करमाळा शहर अध्यक्ष सुजय जगताप, मोरवड येथील छगन मोहोळकर, गोपीनाथ नाळे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *