
मांगी येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न
करमाळा प्रतिनिधी
मांगी येथे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संकल्पनेतून रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात

आल्या, तसेच बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळेस रयत क्रांतीचे राज्य कार्यकारी सदस्य अजय बागल, रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष वारगड, सिकंदर मुलांनी, मकाई सोसायटी माजी चेअरमन जिंती संदीप

जगताप, पत्रकार दशरथ देवकते, विनोद चव्हाण, अंकुश दुर्गुळे, रयत क्रांती संघटना तालुका अध्यक्ष शिव शंकर जगदाळे, प्रताप क्षीरसागर, सुभाष बागल, अशोक बागल, संभाजी बागल, शिवाजी बागल, आदी मान्यवर व महिला भगिनी

उपस्थित होत्या. यावेळेस शिवशंकर जगदाळे संतोष वारगड संभाजी बागल व रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्यकारी सदस्य अजय बागल यांची भाषण झाली व अजय बागल म्हणाले की, गावातील गरीब निराधार गरीब लोकांना अन्नदान योजनेचा

शुभारंभ करणार आहे. मी एक सामान्य कुटुंबातील मुलगा शेवटपर्यंत जनतेसाठी झटणार असून शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असल्याचे अजय बागल यांनी नमूद केले.
