चला आपल्या जीवनात आणि विश्वात सकारात्मक बदल घडवू

करमाळा प्रतिनिधी

आपल्या अंतरात समाविष्ट असलेल्या अनंत ऊर्जेचा सकारात्मक वापर आपण या ना त्या कारणस्तव करू शकत नाही हे आपले दुर्भाग्यच. राग, ताण तणाव, नैराश्य, संकोच, नकारात्मकता अशा अनेक व्याधींनी आपण ग्रासित आहोत. पण त्याच

बरोबर आपल्याला या परिस्थितीतून उत्कर्षा कडे झेप घेण्याची जिद्द सुद्धा असते. आणि नुसते स्वतः पुरते मर्यादित न राहता इतरांचीही उन्नतीस आपण हातभार लावू शकतो अशी एक प्रामाणिक आणि प्रबळ इच्छा आपण उराशी बाळगून असतो. पण आपली व समाजातील परिस्थितीत बदल घडवून कसा आणायचा याचा नेमका मार्ग आपल्याला ठाउक नसतो.

परम पूज्य उपाध्याय  प्रविण ऋषिजी महाराज प्रणित अर्हम् विज्जा फाउंडेशन अशा जागरूक व्यक्तींसाठी ट्रेनर बनण्याचा विशेष online course घेऊन आला आहे. ट्रेनर बनून आपण आपल्या आयुष्याचा मार्ग प्रशस्त तर करायलाच, पण समाजातील नैतिक अधःपतनाला आळा घालून त्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त कराल.

गुरुदेव परम पूज्य  प्रविण ऋषीजी महाराज यांनी स्थापित केलेली अर्हम्  विज्जा फाऊंडेशन ही संस्था आत्म कल्याण व मानव कल्याणाला समर्पित ना-नफा तत्त्वावर आधारित स्वयंसेवी संस्था आहे. जीवनातील विविध पैलूंवर सखोल अभ्यास करणारे अनेक अभ्यासक्रम चालवली जातात:

१. अर्हम् अष्टमंगल ध्यान: कलर थेरेपी वर आधारित चहुमुखी परिवर्तन.

२. अर्हम् पुरुषाकार ध्यान: निरोगी आयुष्य आणि देवत्व यांचे संयोगाचे शास्त्रशुद्ध पद्धत.

३. अर्हम् गर्भ साधना: येणाऱ्या बाळाला जन्मापूर्वी असाधारण संस्काराने अद्वितीय बनविण्यासाठी मातांसाठी विशेष उपक्रम.

४. Arham discover yourself: इतरांना त्यांच्या अंतरातल्या सुप्त गुणांना विकसित करण्यासाठी मार्गदर्शन कसे करावे हे समजण्यासाठी एक अनोखा कोर्स.

५. Arham secret of karma: आपल्या कर्माची अनन्वित शक्तीचा वापर करून आपली नियती स्वतःच निश्चित करण्याचा मार्ग.

६. Arham parenting: आपल्या मुलांमधील क्षमता पूर्णपणे विकसित करण्यासाठी पालकांचे मार्गदर्शन.

७. Arham blissful couple: सौहार्दपूर्ण वैवाहिक जीवनासाठी कोर्स, जे तुमच्या जोडीदाराला देवत्वप्राप्त करण्यास योगदान देईल.

८. अर्हम् योग: आपल्या आतम्याबरोबर समरस होऊन असिमित समाधान प्राप्त करण्याचे प्रभावी मार्ग.

Teacher Training course केल्याचे फायदे:

१. ध्यान साधना व श्वसन प्रक्रियेचे संपूर्ण तंत्र ज्ञात करणे जेणे करुन अध्यात्मिक प्रगती साधता येईल.

२. कार्यशाळा, परिसंवाद, ट्रेनिंग यांचे आयोजन करण्यासाठी आपल्यास सज्ज होता येईल.

३. मानव कल्याणासाठी प्रतीबद्ध असलेल्या समविचारी व्यक्तींच्या ग्रुपचा हिस्सा होणे.

४. वरिष्ठ, तज्ञ व अनुभवी प्रशिक्षाकांचे वेळोवेळी मार्गदर्शन.

स्वतःच्या उत्थानासाठी व मानव कल्याणासाठी कृपया त्वरित नोंदणी करावी, तपशील खालीप्रमाणे:

“अर्हम् विज्जा प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिर”

६ महिने – आठवड्यात एकदा (रात्री ८:३० ते १०:००)

सुरुवात – १९ जून २०२३

१. Donation fee – ₹ ३,०००/- (online course)

२. Offline (प्रत्यक्ष) ७२ तासांचे पूज्य गुरुदेवांसोबत प्रशिक्षण – ₹ २,०००/-

३. अर्हम्  विज्जा प्रशिक्षक गणवेश.

 Registration link: bit.ly/avteachertrainingprogram

संपर्क: 86696 69794 | 88791 95919

website : www.arhamvijja.org

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *