
पंढरपूर मध्ये रस्त्यावर खड्डा दिसता कामा नये, वारकऱ्यांची सोयीसाठी कमतरता करू नका, मागाल तेवढा निधी देऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई प्रतिनिधी
आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होणार असून वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य द्या निधीची कमतरता पडू देणार नाही, देणार नाही सांगत असतानाच गैरसोय झाली तर अधिकाऱ्यांना दोषी धरले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा बंगल्यावर वारकरी समवेत झालेल्या बैठकीत दिला.

यावेळी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष औसेकर महाराज व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वारकऱ्यांच्या सेवेसाठी सरकार सज्ज आहे. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी तीन ठिकाणी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.नगरपालिकेच्या माध्यमातून पंढरपूरच्या रस्त्यावर कुठेही खड्डे दिसता कामा नये.

