
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी बैरागी सोनल ही 2023 च्या १२वी गुणवत्ता शिष्यवृत्तीस पात्र
करमाळा प्रतिनिधी
येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इ.12 वी प्रमाणपत्र परीक्षा 2023 मध्ये इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमधील

विद्यार्थिनी बैरागी सोनल प्रकाश हिने 92.00% गुण मिळवल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या 2023 च्या गुणवत्ता शिष्यवृत्ती पात्र झालेली आहे. या विद्यार्थिनीला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने पुढील शिक्षणासाठी दर वर्षी 80 हजार रुपये प्रमाणे 5 वर्षे हि शिष्यवृत्ती मिळणार आहे.

या यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य

डॉ.अनिल साळुंके, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन करून तिचे कौतुक केले.
