
प्रत्येक बुथवर शिवदूत नेमणूक करा – श्रीकांत गोसावी
शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ
करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात व प्रत्येक बुथवर पाच शिव दुताची नेमणूक करून शासन आपल्या दारीची योजना पोचवा असे आव्हान शिवसेना शासकीय योजना समितीचे अध्यक्ष श्रीकांत गोसावी यांनी व्यक्त केले.

श्रीकांत गोसावी यांचे उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, प्रमुख देवानंद बागल, प्रमुख संजय शीलवंत, उपतालुकाप्रमुख सतीश रुपनर,

उपतालुकाप्रमुख दादासाहेब थोरात, महिला आघाडीच्या नेत्या ज्योतीताई शिंदे, तालुकाप्रमुख प्रियंका ताई गायकवाड, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक निखिल दादा चांदगुडे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, उपशहर प्रमुख नागेश गुरव, राजेंद्र काळे, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीकांत गोसावी म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी काम करावे “शासन आपल्या दारी” या योजनेचा मोठा मेळावा करमाळा शहरात घेण्यात येणार असून यात किमान पाच हजार लोकांना हवे ते दाखले देण्याची नियोजन करण्यात येणार आहे. उपक्रमासाठी सर्व शासकीय अधिकारी सर्व

सेतू कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती महेश चिवटे यांनी दिली आहे. शिवाय करमाळा तालुक्यातील 118 गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या विषयी प्रामाणिक असलेल्या पाच कार्यकर्त्यांची शिवदूत म्हणून नेमणूक करण्यात येणार असून यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार आहेत. ज्यांना एकनाथ शिंदे, तानाजीराव सावंत यांचे विचाराने काम करायचे आहे अशा कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आव्हान महेश चिवटे यांनी केले आहे.