
लोकमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त रक्तदान शिबीर
करमाळा प्रतिनिधी
लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त करमाळा येथे राष्ट्रीय समाज पक्ष व सकल धनगर समाज करमाळा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन व प्रतिमापूजन करण्यात आले.

रक्तदान शिबिराचे उदघाटन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्या हस्ते करण्यात आले होते. श्री रामचंद्र ब. सा. से. संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी, अॅड. सविता ताई शिंदे, अंजली श्रीवास्तव, भाग्यश्री खटके, अनिता मोटे,

सभापती शिवाजीराव बंडगर सर, भारत माने सर, महारणवर सर, गंगाधर वाघमोडे सर, तात्यासाहेब काळे, नरेंद्र सिंह ठाकुर, जगन्नाथ सलगर, अर्जुन राव गाडे, राजाभाऊ कदम, बाळासाहेब मोटे, प्रवीण होगले, जीवन होगले, डॉ. समाधान कोळेकर,

दरगुडे सर आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब टकले व अंगद देवकते यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले.

