इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून कुशल कामगार तयार होतात – भालचिग

करमाळा प्रतिनिधी

इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून कुशल कामगार तयार होतात व ते स्वावलंबी जीवन जगतात असे मत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सोलापूर एस. आर. भालचिग यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था करमाळा येथील छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिर कार्यक्रमावेळी व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. डी. आवडे, माजी प्राचार्य जोहर आवटे, पी. एम. मोरे गटनिदेशक अकलूज, यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, आय.एम.सी. सदस्य दीपक चव्हाण, प्रवीण गायकवाड,  ग्लोबल सायन्स अकॅडमी चे निकत सर, बँक ऑफ इंडिया चे मंगेश सूर्य पुजारी, अविनाश भुंकन, नरेंद्रसिंह ठाकुर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आयटीआय नंतर नोकरीच्या अनेक संधी आहेत शासकीय, निमशासकीय, खाजगी किंवा गाव मध्ये स्वतःचे युनिट उभे करू शकता, परदेशातील नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील युवकांना स्वावलंबी होयची असेल तर आयटीआय हाच खरा राजमार्ग आहे. खाजगी क्षेत्र असो किंवा सार्वजनिक क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेनेसारख्या केंद्रीय, राज्य सरकारच्या संस्था, विविध व्यापारा मधील आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास संधी मिळतेच तसेच खाजगी क्षेत्रातील भरपूर संधी उपलब्ध आहेत. तसेच पात्र उमेदवारांना स्वंयव्यवसायिकांना समापन दुकाने उघडू शकतात, मोटर गॅरेज सुरू करू शकता किंवा कार्यशाळा सुरू करू शकता.

कुशल कामगारांना परदेशा मध्ये उज्वल भवितव्य आहे. आयटीआय कोर्सेस हे एक वर्षापासून तीन वर्ष पर्यंत आहेत. उमेदवारांना टेक्निकल ज्ञान अवगत असल्यामुळे ते स्वतःच्या पायावर भक्कम उभे राहू शकतात. त्यामुळे अनेकांचा कल या क्षेत्राकडे वळत आहे. यावेळी ग्लोबल अकॅडमीचे निकत यांनी विविध ब्रांचेसची माहिती दिली तर आयएमसी सदस्य दीपक चव्हाण यांनी कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत असल्याची माहिती दिली. महाराष्ट्र पोलीस सेवेत भरती झालेले शेलार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  ए. पी. शिंदे, एम. एम. हुलवान, ए. बी. परदेशी, ए.पी. साठे, जे. जी. मनेरी ए. बी.शेलार, वाय. बी .उंटवाल, आर. एम.सूर्यपुजारी,  एस.एल.भंडलकर,ए.एच. भोसले, वाय. डी सिरसट, एस .आय. कट्टीमनी, एस. बी .बागडी, आर. के. महाडिक, एस. ए . शेख आदींनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका सूर्यपुजारी व प्रस्ताविक सागर कट्टीमनी यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *