
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह करमाळा येथील पाच विध्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलिस भर्ती मध्ये विशेष प्रविण्याने निवड
करमाळा प्रतिनिधी
येथील समाजकल्याण विभागाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विध्यार्थी तुषार रणदिवे, अंगद वाघमारे, सचिन जगताप यांची मुंबई शहर पोलिस म्हणून निवड झाली आहे तसेच लक्ष्मण जगताप, आबा पवार यांची

पुणे शहर पोलीस म्हणून निवड झाली आहे. त्यांनी मिळवलेल्या यशा बद्दल त्यांचा वसतिगृहात वसतिगृहाचे अधीक्षक सुभाष भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, वसतिगृहाचे अधीक्षक सुभाष भोसले यांनी वेळोवेळी स्पर्धा परीक्षा बाबतीत मार्गदर्शन केले व वसतिगृहयातील ग्रंथालय मध्ये उपलब्ध स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा आम्हाला यश संपादन करण्यात मोठा फायदा झाला आहे.

