
प्रमुख बागल परिवारातील एकही अर्ज नाही..?
करमाळा प्रतिनिधी
श्री मकाई सहकारी साखर कारखाना लि.भिलारवाडी ता.करमाळा पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूकीत आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. एकूण 71 अर्ज दाखल झाले आहे. बागल गटाचा बालेकिल्ला असे म्हंटले जात आहे परंतु पहिल्यांदाच बागल परिवारातील एकही सदस्यांनी अर्ज भरला नाही याबाबत राजकीय नेते, सदस्य, कार्यकर्ते चांगले वाईट तर्क लावत आहे.

प्रमुख बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, दिग्विजय बागल या पैकी अथवा परिवारातील अर्ज असु शकेल असे मतदारांना वाटत होते पण तसे झाले नाही याला कारण काय..?



