करमाळा शहरामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी

दि. 11 एप्रिल 2023 रोजी करमाळा शहरामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी झाली. स्मारक विद्युत रोषणाईने बहरले होते.तसेच फुलांनी स्मारकाची सजावट देखणी केली होती. स्मारकासमोर व बाहेर अप्रतिम अशी रांगोळी काढण्यात आली होती. सकाळी 10:00 वाजता करमाळा शहरातील अनेक मान्यवरांनी स्मारकास

पुष्पहार अर्पण केले. 11:00 वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन सन्माननीय गणेश भाऊ करे पाटील व विलासरावजी घुमरे सर यांच्या हस्ते केले. दुपारी 2:00 वाजेपर्यंत 56 लोकांनी रक्तदान केले. स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यासाठी आलेल्या मान्यवरांचा सन्मान क्रांतीसुर्य प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने घेण्यात आला. तसेच ज्यांनी रक्तदान केले त्यांना प्रमाणपत्र

व माता सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. वर्षभरात कोणालाही रक्त हवे असेल तर ते मोफत दिले जाईल असे आवाहन क्रांतीसुर्य प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने करण्यात आले. दुपारनंतर 5:00 वाजता यश कल्याणी सेवाभावनामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते सन्माननीय खंडू डोईफोडे यांचे व्याख्यान महात्मा ज्योतिबा फुले यांच्या

सामाजिक व शैक्षणिक कार्याचा जागर व्हावा म्हणून ठेवले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय गणेश भाऊ करे पाटील होते. करमाळा शहरातील अनेक मान्यवर पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. अमोल नाळे,  नवनाथ मोहोळकर सर, विक्रम राऊत, अंकुश जाधव, हनुमंत भोंग सर,  मयूर यादव,

विशाल बनकर, प्रशांत शिंदे व क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे इतर कार्यकर्ते या सर्वांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. तसेच या कार्यक्रमासाठी वर्गणी देऊन मोलाचे सहकार्य केले त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तसेच ज्यांनी रक्तदान केले त्यांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्ते मनापासून झटले म्हणून त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *