करमाळा प्रतिनिधी

सरकारी जागेतील अतिक्रमण काढणेबाबत सकल हिंदू समाज करमाळा तालुकाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या गट नं १०१, १०२ व १०३ मधील सरकारी जागेवर काही व्यक्तींनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले आहे. सदर जागेवर परवानगिशिवाय दर्ग्याचे बांधकाम करण्यात आले असुन, तेथे बोरवेल खोदण्यात आली आहे, तसेच विज जोडणी देखील घेण्यात आलेली आसल्याचे निदर्शनास आले आहे.

सदर बांधकाम, बोरवेल व विज जोडणी यासाठी संबंधीत शासकीय विभागांची आवश्यक परनवानगी घेण्यात आली आहे कि नाही याची सखोल चौकशी करण्यात यावी. जर हे सर्व अनधिकृत असल्याचे अढळुन आले, तर सरकारी जागेवरील अतिक्रमण तात्काळ हाटवुन संबंधीतावर महाराष्ट्र जमिन महसुल संहिता व इतर लागू कायद्यानुसार लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच या अनधिकृत बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या निधीचा स्त्रोत व इतर संबंधित बाबींचीही आवश्यक ती चौकशी करण्यात यावी.

यावेळी सकल हिंदू समाजाचे बंधू उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *