
उद्योजक धनंजय अभंग यांना पुरस्कार
कोर्टी प्रतिनिधी
क्लिन एनर्जी टेक सोलूशन मर्या. या कंपनीने बायोगॅस व किसान गॅस ची विविध संयंत्रे विकसित केलेली आहेत. किसान बायोगॅस मधून शेतकऱ्यांना स्वयंपाकासाठी इंधन व शेतीसाठी खत कमी खर्चात, पर्यावरणाची हानी न होता मिळते. विविध क्षमतेचे व शेतकऱ्यांना परवडेल असे model बनवण्यात कंपनीला यश आले आहे.

या कंपनीनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय निलकंठ अभंग हे असून त्यांच्या कंपनीने विकसित केलेल्या किसान गॅस युनिट ची दखल आस्ट्रिया सरकारने घेऊन, किसान गॅस ला “Energy Globe National Award 2022” चा पुरस्कार दिनांक १०/२/२०२२ रोजी नवी दिल्ली येथील आस्ट्रियाच्या दुतावास कार्यालयात देण्यात आला. या प्रसंगी आस्ट्रियाचे राजदूत Katharina wieser, व्यापार आयुक्त Jorg Hortnagi आणि अदानी ग्रूपचे उपाध्यक्ष नवीन मोघा आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नवीन उद्योजक धनंजय अभंग चे अभिनंदन होत आहे.

