
करमाळा प्रतिनिधी
दलित महासंघाची रेस्ट हाऊस करमाळा येथे सामाजिक कार्याची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, तालुका अध्यक्ष दीपक आरणे, जिल्हा संघटक चव्हाण मामा, तालुका संघटक प्रदीप आल्हाट, यांच्या मार्गदर्शनाखाली नागेश पोळ यांची करमाळा तालुका संपर्कप्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली. त्याचबरोबर या बैठकीमध्ये (अ ब क ड) आरक्षण उपवर्गीकरण तसेच अनेक सामाजिक प्रश्नांवर चर्चा झाली.

यावेळी दीपक पोळ, मंगेश काकडे, दशरथ पानसरे, संदीप पवार, तानाजी लोंढे, राहुल पवार, गिराम गुरुजी, कांतीलाल गलांडे, कांबळे, रामदास साळुंखे आदिजण उपस्थित होते.


