
जेआरडी माझा
पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या आदेशाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष शहाजी यादव यांच्या पाठपुराव्यामुळे तसेच भारतीय जनता पार्टीचे माढा पूर्वचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांच्या प्रयत्नातून सोलंकरवाडी (ता. माढा) येथे विद्युत ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला. मागील कित्येक वर्षापासून या ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर ची मागणी होत होती. त्या मागणीचा सकारात्मक विचार करून तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी विद्युत ट्रांसफार्मर मंजूर करून घेतला. त्या ट्रांसफार्मरचे लोकार्पण तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते झाले.

या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलताना तालुकाध्यक्ष योगेश पाटील म्हणाले की, भविष्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोलंकरवाडी सह पंचक्रोशीतील गावे समृद्ध करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू.

मागील वर्षी सोलंकरवाडी ते पडसाळी कडे जाणारा रस्त्याचे काम करून दोन्ही गावातील लोकांचे जाणे येण्याची सोय करून दिली. त्याचबरोबर पडसाळी सोलंकरवाडी शिवरस्ता देखील मंजूर करून घेतला असून येत्या काही दिवसात ते देखील काम सुरू होऊन शेकडो नागरिकांचा रस्त्याचा विषय मार्गी लागेल.

यावेळी भीमराव मोरे भाऊसाहेब व वामन भाऊ यादव यांनी पूजन करून नारळ वाढवला.
यावेळी सचिन दादा पाटील, युवा नेते अतुल माळी, युवा नेते शहाजी यादव, पोलीस पाटील बंडू माळी, श्याम माळी, रमेश मोरे, संजय मोरे दीपक सोलंकर, बालाजी माळी, तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह सोलंकरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.