
आदिनाथ व मकाई साखर कारखान्याच्या निवडणुकीचा लवकरच बिगुल वाजणार ,३० जून च्या आत निवडणुक प्रक्रिया पूर्ण होणार : – राज्यातील सहकारी संस्थांच्या सहाव्या टप्प्यातील निवडणुकीचा धडाका आता लवकर सुरू होणार असून तालुक्यातील श्री . आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांसाठीची तयारी आता तातडीने सुरू होईल . मकाई साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत ३० डिसेंबर २०२१ रोजी तर आदिनाथ साखर कारखान्याच्या संचालक

मंडळाची मुदत १९ मे २०२२ रोजी संपलेली आहे .राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू करण्याची कार्यवाही करणे बाबत आदेशीत केलेले आहे .यामध्ये राज्यातील तब्बल वीस हजार 642 सहकारी संस्थांचा समावेश आहे .सन 2021 व 2022 मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांबरोबरच सन 2023 मध्ये मधील पात्र सहकारी संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही सुरू

करण्यासाठी देखील प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविलेला आहे .यामध्ये अ वर्गातील 67,ब वर्गातील 1014,क वर्गातील दहा हजार 163 ड वर्गातील नऊ हजार 398अशा एकूण 20642 सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे .या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेस एक मार्च 2023 पासून सुरुवात करून 30 जून 2023 च्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे मुख्य आयुक्त डॉ . जगदीश पाटील यांच्या मान्यतेने सचिव, राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे सचिव डॉ पी एल खंडागळे यांनी दिलेले आहेत .
