करमाळा ते श्री क्षेत्र संगोबा या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ठेकेदार अधिकारी यांची मिलीभगत- महानवर
करमाळा प्रतिनिधी
करमाळा ते श्री क्षेत्र संगोबा या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत या रस्त्याच्या कामामध्ये अधिकारी व ठेकेदारांची मिली भगत असल्याचा संशय येत आहे अशी माहिती धनगर समाज उन्नती मंडळाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनोद महानवर यांनी व्यक्त केले करमाळा संगोबा रस्त्याचे गेल्या वर्षी20 22 सालामध्ये झालेल्या असून या रस्त्याच्या कामामध्ये काम न करता बिल काढण्याचा प्रकार झालेला आहे रस्त्याचे साईट पट्टी व गटार काम न करता बिल आदर करण्यात आलेले

आहे करमाळा अभियंता यांना माहिती विचारले असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली अकलूज येथे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सविस्तर प्रकरणासाठी अपील करण्यात आले 29/12/2022 या दिवशी अपील करण्यात आले सुनावणी सुनावणी 21/1/2023 रोजी अकलूज येथे जन माहिती अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या समक्ष झाली सुनावणी

मध्ये त्यांनी आदेश काढला की संबंधित अपील करताना शुल्क भरून सात दिवसाच्या आत माहिती त्वरित द्यावी तरीदेखील सांबाउपविभाग करमाळा माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत व कारणे देत आहेत या कामांमध्ये ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहेत या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी व संबंधित ठेकेदाराला काळयादीमध्ये टाकण्यात यावे या कामाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *