करमाळा प्रतिनिधी

कै.नामदेवराव जगताप न.प. उर्दू शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेतील विद्यार्थ्यीनीचा मुस्लिम विकास परिषदेतर्फे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक प्रतीजा वेदपाठक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक इकरा मजहर शेख, व्दितीय क्रमांक शाहीस्ता सत्तार शेख, तृतीय क्रमांक जारा मुनाफ कुरेशी या गुणवंत विद्यार्थीनीचा सन्मान करण्यात आला. यावेळी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर, 

इंग्रजीचे शिक्षक इब्राहिम मुजावर तसेच हाज यात्रेसाठी मुन्ना सय्यद यांचा ही सन्मान मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष फारुक जमादार, जहांगीर बेग, न्यु इरा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष अजीम मोगल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर शेख,  बकशभई शेख, जमीर शेख, आझाद शेख जिशान कबीर, सुहास आगलावे, जुबेर सय्यद, अशपाक सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वेदपाठक म्हणाले की, मुलींनी पुढे उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील, इंजिनिअर अधिकारी व्हावं अश्या शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरबाज बेग, असीम बेग, समीर शेख, शाहरुख शेख, शाहीद बेग, जावेद शेख, आलीम खान, जुबेर सय्यद, आदींनी परिश्रम घेतले तसेच सर्वांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *