
साम्राज्य आरमार शिवजन्मोत्सव २०२३ निमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न
कुर्डुवाडी प्रतिनिधी
कुर्डूवाडी शहरातील साम्राज्य आरमार संघटनेने शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीरात ५३७ रक्तदात्यांनी रक्तदान करुन शिवरायांना आदरांजली अर्पीत केली.
या रक्तदान शिबीराचे ऊदघाटन ऊपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम,तहसीलदार राजेश चव्हाण,पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे,गटविकास अधिकारी संताजी पाटील,पोलीस ऊपनिरक्षक हनूमंत वाघमारे,डाॅ.राजेद्र दास,डाॅ.विलास मेहता,डाॅ.जयंत करंदीकर,डाॅक्टर असोशिएनचे डाॅ.अशिष शहा यांचे शुभहस्ते रक्तदान शिबीराचे ऊदघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक ऊमेश भाऊ पाटील तर सुञसंचालन लक्ष्मण भाऊ पवार यांनी केले.
या वेळी भाजपा प्रांतीक सदस्य गोविंद आबा कुलकर्णी,डाॅ लकी दोशी,डाॅ.हर्षद शहा,डाॅ.मयुर वाघमोडे,डाॅ.हेमंत काळे,डाॅ.विवेकानंद पाटील,डाॅ.सचिन गोडसे,डाॅ.रोहीत दास,डाॅ.अमित दोशी,भाजपा महिला शहरअध्यक्षा प्रतिक्षाताई गोफणे,शिवसेना तालुका ऊपप्रमुख राजेंद्र वाल्मीकी,संतोष क्षिरसागर,प्रवीण सोमासे,कल्याण बागल,शेषराज करळे,अमोल कुलकर्णी,हरीश भराटे,सागर गायकवाड,सागर तरंगे,पोलीस कर्मचारी सागर सुरवसे,सोनवणे,राजकुमार बागल,संदीप

हा सोहळा संपन्न झाला.
ऊपस्थीत मान्यवरांचे मानाचा फेटा बांधुन व पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले.
शिवप्रेमीनी या रक्तदान शिबीराला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल शिवजन्मोत्सव सामीती २०२३ चे अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
या शिबीरासाठी साम्राज्य आरमार संघटनेचे सर्व कार्यकर्ते यांनी परीश्रम घेतले.
