करमाळा कृष्णाजी नगर परिसर अतिक्रमण हटविण्यास सुरूवात
कमलाई नगरी
करमाळा ते कमलाई मंदिर रोड लगत असणाऱ्या कृष्णाजी नगर परिसरातील अतिक्रमण हटावण्याची मोहीम करमाळा नगर परिषद,सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहे.
कृष्णाजी नगर परिसरात भाजी मंडईवाले हातगाडे वालेे टपरी धारक आदींनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते याबाबत

त्या भागातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी करमाळा नगरपरिषद कार्यालयात तक्रार केली होती त्याची दखल घेत नगरपरिषद अधिकारी व सार्वजनिक बांधकाम अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे जेसीबीच्या साहयाने आजूबाजूचे टपरी उचलून घेऊन जात आहेत भाजी विक्रेते फळ विक्रेते आदी जणांना तिथून हटवण्यास सुरुवात केली आहे.


…..
नगर परिषद व बांधकाम विभाग दोन्ही विभागाच्या मार्फत अतिक्रमण हटविण्यात येत आहे भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांना त्या परिसरात भाजी मंडई केली आहे तेथे जावे अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे – बालाजी लोंढे,मुख्याधिकारी नगर परिषद, करमाळा


…….
नगर परिषदेने आमचे रोजी रोटी काढुण टाकत आहे आम्ही जगायचे कसे आता आम्ही सर्व टपरी धारकांना नगर परिषदेने पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी – फंड व ईतर टपरी धारक,करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *