
करमाळा अर्बन बँकेचे नूतन संचालक चंद्रकांत चुंबळकर यांचा बाळासाहेबांच्या शिवसेने कडून सत्कार
करमाळा प्रतिनिधी
करमाळ्यातील सर्वात जुनी बँक म्हणून ओळखले जाणाऱ्या करमाळा अर्बन बँकेच्या संचालक पदी किल्ला विभागातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चुंबळकर यांची बिनविरोध निवड झाली असून या निवडीबद्दल त्यांचा सत्कार बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला

यावेळी युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे हिवरवाडी चे शाखाप्रमुख आजिनाथ इरकर हिवरवाडी चे माजी सरपंच राजेंद्र मिरगळ टेंभुर्णी चे प्रसिद्ध मंडप कॉन्ट्रॅक्टर संदीप वाघे मंगेश गोडसे मंजूर शेख निलेश चव्हाण मारुती भोसले नागेश शेंडगे आधी उपस्थित होते

बोलताना चंद्रकांत चुंबळकर म्हणाले की कै गिरीधर दास देवी यांच्या नेतृत्वाखाली अर्बन बँकेने नावलौकिक कमावलेला आहे येणाऱ्या काळात सुद्धा सर्व अडचणीवर मात करून करमाळा अर्बन बँक पुन्हा एकदा करमाळातील शहरातील नागरिकांच्या विश्वासाची बँक बनेल असा विश्वास व्यक्त केला बँकेचे चेअरमन कन्हैया लाल देवी यांच्या नेतृत्वाखाली. आरबीआयच्या नियमाप्रमाणे भाग भांडवल पूर्ण झाले असून वसुलीचे काम जोरात सुरू आहे येणाऱ्या काळात अर्बन बँक करमाळा शहरवासी यांच्यासाठी मदतीचा आधार ठरेल असा विश्वास व्यक्त केला
