
करमाळा टेंभुर्णी या महामार्गाचे काम रखडण्याची चिन्हे दिसत आहेत – गुलाबराव बागल
करमाळा प्रतिनिधी
जिल्हाधिकारी शंभरकर सो यांना करमाळा ते टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 च्या समस्या बाबत सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव बागल यांनी निवेदन दिले आहे.
करमाळा ते टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 चे महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनाकडे हस्तांतर नुकतेच झालेले आहे परंतु सोलापूर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या चिटणीस सो यांनी मोनार्च डीपी कार्यालयास या महामार्गाच्या डीपी चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे लेखी आदेश देऊनही मोनार्च कंपनीच्या कार्यालयाने अद्याप काहीही हालचाल सुरू केलेली

नाही सदर कार्यालयास आम्ही प्रत्यक्ष दोन-तीन वेळेस भेट दिली असता या महामार्गाच्या कामकाजास आम्ही अद्याप सुरूवात केलेली नाही व आम्ही ते लवकर सुरू करू शकत नाही असे उत्तर त्यांच्याकडून मिळाले आहे त्यामुळे या महामार्गाचे काम रखडण्याची चिन्हे दिसत आहेत तरी या दोन्ही कार्यालयाचा समन्वय आपण घडवून आणावा व या महामार्गाच्या कामास गती द्यावी अशी मागणी
गुलाबराव बागल यांनी केली आहे

…..
मोनार्च कंपनीच्या पुण्याच्या कार्यालयास दोन व्यक्तीनी भेट दिली आहे मी स्वत: ऑफिसला फोनवर संपर्क साधला आहे त्याच्यामते त्यानी या महामार्गाच्या या टप्प्याचे पूर्वी काम केलेले आहे त्याचा मोबदला त्याना मिळालेला नाही त्यामुळे ते काम सुरू करत नाहीत
