करमाळा प्रतिनिधी

दहिगाव चे पाणी नेरले तलावात, बंधाऱ्यात सोडण्याची मागणी नेरले ग्रापं माजीसरपंच औदुंबरराजे यांनी केले आहे.* दहिगाव चे पाणी नेरले सालसे तलावात सोडण्याची मागणी नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबर राजेभोसले यांनी केले .आहे पावसाळा सुरू असला तरी सालसे केम नेरले परिसरामध्ये पाऊस समाधानकारक नाही.त्यामुळे विहिरीला ओढ्याला पाणी नाही कुर्डूवाडी करमाळा रोड जवळ साडे ओढ्यावर नेरले सालसे तलाव आहे.व घोटी येथून येणाऱ्या ओढ्यावर देखील नेरले येथे तलाव आहे.या दोन्ही ओढ्यावर अनेक छोटे मोठे बंधारे आहेत.बंधाऱ्यात व तलावात थेंब देखील पाण्याचा नाही जनावरांना चारा उपलब्ध झाला आहे.पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.त्यामुळे उजनी धरण भरण्याच्या मार्गावर आहे.पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडणे गरजेचे आहे.दोन्ही तलावाच्या, बंधाऱ्याच्या पाण्यावर वरकुटे अळसुंदे सालसे नेरले आवाटी लोणी ता.माढा या अनेक गावाचा पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या सिंचनाचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अवलंबून आहे.दहिगाव योजनेचे पाणी साडे येथून सोडल्यास नेरले सालसे तलाव भरू शकतो.निंभोरे घोटीतून सोडल्यास दुसरा तलाव बंधारे भरू शकतात पाणी सोडण्याचे आम्ही दिनांक रोजी कुकडी डावा कालवा उपविभाग करमाळा यांना लेखी निवेदन दिले आहे. उजनीचे पाणी 100 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते शकत नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे त्याचा विचार लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी यांनी करून पिण्यासाठी पाणी सोडण्याची विनंती नागरिकांच्या वतीने नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक श्री औदुंबर राजे भोसले यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *