मुख्यमंत्री पदाच्या काळात दोन वेळा टप्पा वाढ अनुदान मीच दिले

करमाळा प्रतिनिधी

शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीकडून पुणे शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या मंगेश चिवटे यांच्या शिक्षकांच्या प्रश्न संदर्भात केलेल्या प्रयत्नाच्या अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, एकनाथ स्वाभिमानी शिक्षण शिक्षक  संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अडसूळ सर, कल्याण शेट्टी सर, शिवसेना वैद्यकीय कक्ष समन्वयक निलेश शेठ राठोड, शिक्षक मित्र महेंद्र लोकरे (टेंभुर्णी), प्रचार प्रमुख दीपकराव पाटणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मी दोन वेळा टप्पा अनुदान वाढ दिली आहे. जुन्या पेन्शन योजने संदर्भात मंगेश सातत्याने आग्रह करत असून लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या समवेत जुनी पेन्शन योजने संदर्भात लढाई उभा करणाऱ्या संघटनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात लवकर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे.

ही योजना सुरू करण्यासाठी शासनाला सुमारे 30 हजार कोटी रुपये खर्च येईल असा बागलबुवा काही प्रशासकीय अधिकारी करून त्या योजनेला खोडा घालत असून ही योजना तात्काळ सुरू करण्यासाठी केवळ 750 कोटी रुपयांची गरज आहे याच्या माहितीचा अहवाल कागदोपत्री मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. 750 कोटी रुपयांत ही योजना सुरू होत असेल तर याला तात्काळ मंजुरी देण्यासाठी मंत्रिमंडळ निर्णय घेईल असा शब्द यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश चिवटे यांना दिला.

पुणे शिक्षक मतदार संघात 5 जिल्हे व 58 तालुक्यात मंगेश चिवटे यांचा प्रचार दौरा पूर्ण झाला आहे. या मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने, खासदार ज्योतीताई वाघमारे, मंत्री शंभूराजे देसाई, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुहास बाबर, आमदार यड्रावकर, माजी आमदार शहाजी बापू पाटील हे व या मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी मतदार नोंदणीचे काम करीत प्रचार करत आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *