करमाळा प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य दहीहंडी उत्सव उत्साह, जल्लोष आणि प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.

युवा शक्तीचा उत्साह, गोविंदांचा थरार आणि भगव्या विचारांचा जयघोष यामुळे करमाळा नगरी दुमदुमून गेली होती. यावेळी भाजपाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *