करमाळा प्रतिनिधी

दिनांक, 8/9/ 2026 रोजी चला शाळेत जाऊया, या अभियाना अंतर्गत पुणे विभागीय उपसंचालक गणपतराव मोरे यांनी अचानक भेट दिली. सदरील भेटीदरम्यान त्यांनी इयत्ता चौथी वर्गाचे मूल्यमापन केले. मूल्यमापमानामध्ये विषय निहाय प्रत्येक विषयाचे पाच प्रश्न विद्यार्थ्यांना लेखी स्वरूपात लिहिण्यास सांगितले. असता विद्यार्थी गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले तसेच भौतिक सुविधा, शालेय निसर्गरम्य परिसर,परसबाग,शालेय पोषण आहार,वॉटर फिल्टर चे पाणी मुलामुलींचे शौचालय, विद्यार्थी गणवेश, शालेय पाठ्यपुस्तक या सर्व गोष्टींचे नियोजन पाहून शाळेतील सर्व शिक्षकांचे त्यांनी कौतुक आणि अभिनंदन केले. तसे पाहिले तर वीट जिल्हा परिषद शाळा गेल्या दहा वर्षांमध्ये पटसंख्या टिकून ठेवण्याच्या बाबतीत, गुणवत्तेच्या बाबतीत व विविध स्पर्धेमध्ये, टॅलेंट स्पर्धेमधील संमोहनृत्य असेल खो-खो स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल लंगडी असेल, चित्रकला स्पर्धा असेल या सर्व विविध स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये पहिल्या तीन शाळेमध्ये वीट या शाळेचे आवर्जून नाव घेतले जाते.

त्या अनुषंगाने चला शाळेत जाऊया अभियानांतर्गत त्यांच्यासोबत आलेले डायटचे अधिव्याख्याता पाटील सर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे सचिव निळ सर तसेच करमाळा पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष सभापती पुजाताई ढेरे, गटशिक्षणाधिकारी रिंकल हाडके मॅडम, विस्तार अधिकारी जयवंत नलावडे, टकले साहेब, नितीन कदम, केंद्रप्रमुख प्रसाद कुलकर्णी सर्वजण उपस्थित होते. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल ढेरे व शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन ढेरे सर यांनी आलेल्या सर्व अधिकारी वर्गांचा शाळेच्या वतीने सन्मानपूर्वक सन्मान केला स्वागत केले. व चोरमले सर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *