करमाळा प्रतिनिधी

दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात कार्यरत असलेले संशोधक प्रा. डॉ. ज्ञानदेव गाढवे यांचा डिझाईन ऑफ एक्सपेरीमेंट (डिओई) इनॅबेल्ड डेप्हलपमेंट अँण्ड ऑप्टिमायजेशन ऑफ इनहेल्ड लोरलाटिनिब लोडेड लिपिड कॅरिअर फॉर लन्ग कॅन्सर थेराप्युटिक्स हा संशोधन लेख जागतिक कीर्तीच्या अमेरिकन जरनल ऑफ रेसपिरेटरी अँण्ड क्रिटिकल केअर मेडिसिन या क्यु एक श्रेणीतील आणि २१.७ इम्पॅक्ट फॅक्टर असलेल्या प्रतिष्ठित इंटरनॅशनल जरनल मध्ये प्रकाशित झाले आहे. हे इंटरनॅशनल जरनल जगातील अग्रगण्य श्वसनविकार विषयक संशोधन नियतकालिकांपैकी दुसऱ्या क्रमांकावर असून अमेरिकन थोरॅसिस सोसायटी (एटीएस) तर्फे प्रकाशित केले जाते.

या उल्लेखनीय यशाबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक (एम. डी.) पृथ्वीराज माया रामदास झोळ यांनी प्रा. डॉ. ज्ञानदेव गाढवे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याबाबत बोलताना व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज माया रामदास झोळ म्हणाले, “फुफ्फुसाच्या कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावी, सुरक्षित आणि रुग्णकेंद्रित करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भविष्यात या संशोधनाचा लाभ रुग्ण, वैद्यकीय तज्ज्ञ, औषधनिर्मिती उद्योग तसेच आरोग्य क्षेत्रातील संशोधकांना होईल. अशा जागतिक दर्जाच्या संशोधनामुळे दत्तकला शिक्षण संस्था संचलित दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उंचावत असून विद्यार्थ्यांनाही संशोधनाची प्रेरणा मिळत आहे.”

यावेळी पृथ्वीराज झोळ म्हणाले की, दत्तकला शिक्षण संस्था संचलित दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक संशोधन सुविधा, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण आणि संशोधनाला दिले जाणारे प्रोत्साहन यामुळेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन घडत आहे. प्रा. डॉ. ज्ञानदेव गाढवे यांनी केलेल्या या उल्लेखनीय संशोधनामुळे केवळ संस्थेचीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्राचीही प्रतिष्ठा जागतिक स्तरावर उंचावली आहे. भविष्यातही अशाच उच्च दर्जाच्या संशोधनासाठी संस्था सर्वतोपरी सहकार्य करीत राहील.

या उल्लेखनीय यशाबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव माया रामदास झोळ तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर यांनी प्रा. डॉ. ज्ञानदेव गाढवे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रा. रामदास झोळ म्हणाले, “औषधनिर्माण क्षेत्रात नावीन्यपूर्ण, वैज्ञानिकदृष्ट्या भक्कम आणि जागतिक दर्जाचे संशोधन ही काळाची गरज आहे. अशा संशोधनातून अधिक परिणामकारक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण औषधनिर्मितीला चालना मिळते तसेच समाजाच्या आरोग्यवृद्धीस मोठे योगदान मिळते. प्रा. डॉ. ज्ञानदेव गाढवे यांचे हे संशोधन दत्तकला शिक्षण संस्थेच्या संशोधन संस्कृतीचे आणि गुणवत्तेचे प्रतीक असून यामुळे संस्थेची शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक दृढ होईल.”

प्रा. डॉ. गाढवे यांच्या या यशाबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक तसेच कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संशोधन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *