करमाळा प्रतिनिधी

दिनांक 28/05/2026 रोजी बकरी ईद (ईद उल अजहा) ची नमाजपठण करमाळा शहरातील मौलाली माळ येथील ईदगाह मैदानावर ठीक सकाळी 07:45 वा. होईल अशी माहिती करमाळा शहरातील शहर काझी हाजी कलीम काझी सर यांनी सांगितले असुन शहर व तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

समाज बांधवांनी ईदची नमाजपठण झाल्यानंतर शांततामय वातावरणात कुर्बानी करावी व कुर्बानी केल्यानंतर कोणतेही चित्र किंवा व्हिडिओ चित्रीकरण न करता सोशल मीडिया वर प्रसारित करु नये. तसेच कुर्बानी केल्यानंतर परिसरात घाण न करता आपला परिसर स्वच्छ ठेवा व शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे नियम पाळुन प्रशासनास सहकार्य करावे, शेतकरी बांधवांकरिता पावसासाठी प्रार्थना करावी व मोठ्या भक्तिभावाने ईदचा सण साजरा करावा असे आवाहन सर्व मुस्लीम समाज बांधवांना केले आहे.

यावेळी मुस्तकीम पठाण,  सुरज शेख, अॅड. नईम काझी, रमजान बेग, समीर शेख, आझाद शेख, दिशान कबीर,समीर बागवान, अमीर शेख,  आलिम खान,  कलीम शेख, अलीम शेख, सोहेल पठाण, अमीर शेख, सुपरान शेख, अय्युब शेख, आम्मो मदारी, दाऊद मदारी, कय्युम मदारी,अक्रम मदारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *