करमाळा प्रतिनिधी

गाईला राष्ट्रीय पशु म्हणून सरकारने जाहीर करावे अशी मागणी करमाळा तालुका मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी व मा.नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांनी केली आहे.

यावेळी तांबोळी म्हणाले की, सध्या काही ठिकाणी गाईंच्या कत्तली केल्या जात आहेत. गाईला राष्ट्रीय पशु म्हणून सरकारने जाहीर केले तरच गाईच्या कत्तली थांबेल. करमाळा शहर व तालुक्यातील मुस्लिम समाज जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना यासंदर्भात निवेदन देणार आहे. असे तांबोळी बंधुंनी सांगितले आहे.

यावेळी उपस्थित इंदाज वस्ताद, अफरोज पठाण, खलील कुरेशी, घस्सु कुरेशी, मुस्ताक शेख, खलील बागवान, अरशान पठाण, राजु तांबोळी, मौला तांबोळी, अबु आतार, सिकंदर मौलाना, अजहर अमिरसेठ तांबोळी, अमिन बेग व इतर सदस्य मिटींगला उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *