
करमाळा प्रतिनिधी
कृषी विभागाच्या वतीने करमाळा तालुक्यात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन खरीप हंगाम पुर्वतयारी मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत असून शेटफळ येथे आयोजित कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी सुप्रिया शेलार यांनी शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक, हुमणी किड व्यवस्थापन व कृषी विभागाच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना दिली.

तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड यांनी जेऊर कृषी मंडळमध्ये प्रत्येक गावात खरीप लागवड पूर्व तयारी मार्गदर्शन मोहीम राबवली असून यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी विभागातील कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत यामध्ये कृषी विभागाच्या जलतारा योजनेविषयी सविस्तर माहिती सांगितली तसेच बीज प्रक्रिया व बीज उगवण क्षमतेच प्रात्यक्षिक करून दाखवले जाते व बीज प्रक्रिया व बीज उगवणक्षमतेची सविस्तर माहिती सांगितली तसेच कृषी विभागाच्या सर्व महाडबीत वरील योजनांची सविस्तर माहिती सांगितली.

त्याचप्रमाणे भाऊसाहेब फुंडकर व रोजगार हमी तील फळबाग लागवडीविषयी माहिती सांगितली सर्व शेतकऱ्यांचे महाविस्तार ॲप डाऊनलोड करून देण्यात येत असून त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांना माहिती सांगून जनजागृती केली जात आहे. यावेळी पी एम एफ एम ई या योजनेविषयीही माहिती सांगून जर शेतकऱ्यांना शक्य असेल तर जोडधंदा म्हणून हा उद्योग करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणींवर चर्चा केली व त्यांच्या अडचणी कृषी विभागामार्फत नक्कीच सोड सोडवण्यात येतील अशी माहिती मारकड यांनी दिली आहे.

