करमाळा प्रतिनिधी  

जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल, झरे येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र भाषेविषयी प्रेम, अभिरुची व आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच हिंदी भाषेच्या महत्त्वावर विद्यार्थ्यांची विविध भाषणे आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अमृता परदेशी, सहशिक्षक सतीश कोंडलकर, हिंदी अध्यापिका नफिसा गोणे व अर्चना कादगे तसेच इतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्पर्धा व भाषणांची तयारी करून घेतली. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हिंदी दिवसाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य, वक्तृत्वकला व सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळाले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *