
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी कला शाखेत परीक्षेस बसलेले 312 पैकी 280 उत्तीर्ण, वाणिज्य शाखेत परीक्षेस बसलेले 203 पैकी 197 उत्तीर्ण व विज्ञान शाखेत परीक्षेस बसलेले 232 पैकी 230 उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निकाल खालील प्रमाणे लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव विलासराव घुमरे (सर), अध्यक्ष मिलींद फंड (सर), महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए.पी. माने वरिष्ठ विभाग उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभाग प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक, सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी व यशवंत परिवारातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

कला (एकुण निकाल ८९.७४%) प्रथम गुरव वैष्णवी राजेंद्र ८४.६७%, द्वितीय क्षिरसागर वैष्णवी दत्तात्रय ८०.६७%, तृतीय नेटके वर्षाराणी विजय ७९.६७%
वाणिज्य (एकुण निकाल ९७.०४%) प्रथम वासाणी यशस्वी राजेंद्र ९१.१७%, द्वितीय खिलोशिया प्रतिक संदीप ८४.६७%, तृतीय शिंदे निलेश नाना ८४.००%

विज्ञान (एकुण निकाल ९९.५५%) प्रथम कुदळे शिवांजली दिंगबर ७५.६७%, द्वितीय बोरगांवकर ओंकार सतिश ७२.३३%, तृतीय झिंजाडे ऋतुजा नितीन ७२.१७%
वाणिज्य विभागात अकोंटन्सी विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळणारे 2 विद्यार्थी व अर्थशास्त्र विषयास १०० पैकी ९७ गुण मिळणारे ०२ विद्यार्थी आहेत.

