करमाळा प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या वतीने आज (दि. १६ सप्टेंबर) ‘जागतिक ओझोन दिन’ विविध उपक्रमांनी व मार्गदर्शक व्याख्यानांनी उत्साहात साजरा करण्यात आला. “ओझोन थराचे संरक्षण – सुरक्षित भविष्याची हमी” ही या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती.

भूगोल विभागाच्या सभागृहात सकाळी ९:०० वाजता आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजया गायकवाड या होत्या. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अभिमन्यू माने आणि उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिल साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात जर्मन भूगोलतज्ञ अलेक्झांडर हम्बोल्ट यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून झाली. 

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना विज्ञान विभाग प्रमुख प्रा. विष्णू शिंदे यांनी “ओझोन थराचे संरक्षण : आजची गरज, उद्याची जबाबदारी” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच भूगोल विभागाचे प्रा. राजहंस कांबळे यांनी “ओझोन थराची झीज : कारणे, परिणाम आणि उपाययोजना” या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने व उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

“पर्यावरण वाचवा… जीवन वाचवा…” असा संदेश देत ओझोन थराचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. प्रा. महेश जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच अत्यंत अभ्यासू व उत्कृष्ट शैलीत प्रा. उत्तम विटूकडे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाच्या शेवटी कृष्णा पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. सुधीर मुळीक व प्रा. धीरज पाचपिले व इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *