करमाळा प्रतिनिधी

नगरपालिका क्षेत्रातील सर्व शिक्षकांचा शिक्षक दिन दिनांक 15-9-2026 (वार- मंगळवार) या दिवशी साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अतुल (भैय्या) फंड व नगरसेवक तथा गटनेते संजय सावंत (आण्णा) सावंत यांच्या प्रेरणेतून व मुख्याधिकारी सचिन तपसे व प्रशासन अधिकारी जयवंत नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. नामसाधना प्राथ. विद्यामंदिर सेंट्रल स्कूल मुले नं. 1 या शाळेचे विद्यार्थी शर्विल प्रदीप मस्कर इ-4थी, पृथ्वीराज विशाल घोलप इ-4थी, विश्वजीत सुनील सावंत इ-4थी (वर्गशिक्षिका- सुषमा उबाळे मॅडम), शिवांश रविराज लावंड इ-4थी (वर्गशिक्षिका- अश्विनी ठाकरे मॅडम), सुयश दयानंद चौधरी इ-5वी. शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत यश संपादन केले. श्रेयस मनोज बोबडे याने सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश मिळविला.

(वर्गशिक्षक- सुरेश कोळी सर), साधनाबाई नामदेवराव जगताप प्रशाला मुलींची शाळा नं- 1 या शाळेतील विद्यार्थिनी शरयू रघुनाथ फरतडे इ-4थी (वर्गशिक्षक- रमेश नामदे सर) हिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. वरील सर्व विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन व वर्ग शिक्षकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. नामदेवराव जगताप न.प.उर्दू प्रशाला या शाळेतील इ-10वी मधील विद्यार्थी इकरा मजहर शेख (प्रथम क्रमांक), शाहिस्ता सत्तार शेख (द्वितीय क्रमांक), जारा मुनाफ कुरेशी (तृतीय क्रमांक)

सदर विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त सर्व मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक/ शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला. तसेच उल्लेखनीय कार्य सुनंदा जाधव मॅडम यांना शिक्षक संजीवनी मासिक परिवाराचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. जुबेर जनवाडकर सर यांच्या शाळेतील इयत्ता दहावीचा निकाल 100% लागला. दयानंद चौधरी सर यांनी त्यांच्या शाळेत इ-5वी चा वर्ग चालू केला व 57 मुली दाखल झाल्या. विक्रम राऊत सर यांची केंद्र समन्वयक पदी निवड झाली. संध्या शिंदे मॅडम यांना यश कल्याणी सेवाभावी संस्थेचा समाजदीप पुरस्कार मिळाला. नगरपालिका शिक्षण मंडळाचे वरिष्ठ लिपिक शिवदास कोकाटे हे सेवेतून निवृत्त झाले. या सर्वांचा विशेष सन्मान करण्यात आला. सुषमा रवींद्रनाथ उबाळे व चंद्रकला सतीश टांगडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुषमा उबाळे मॅडम, चंद्रकला टांगडे मॅडम, माया भागवत मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांची काटेवरची कसरत असते. शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळून विद्यार्थी घडवावे लागतात. असे मत नगरसेवक रवीभाऊ जाधव यांनी व्यक्त केले. विद्यार्थी हे भारताचे भावी नागरिक असतात. त्यांना आकार देण्याचं काम शिक्षक करतात. असे मत नगरसेविका स्वातीताई फंड यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान ए.आय.चा वापर करून जागतिक बाजारपेठेत तो टिकला पाहिजे. असे मत नगरसेवक तथा गटनेते दिपक चव्हाण यांनी व्यक्त केले. आदर्श शिक्षक म्हणून जरी निवड ठराविक शिक्षकांची केली तरी सुद्धा सर्वच शिक्षक आदर्श असतात.विद्यार्थी हे आपले दैवत आहे असे समजून विद्यार्थ्यांना घडवण्याचं पवित्र काम शिक्षक करत असतात.माणूस म्हणून व सुजान नागरिक म्हणून जगायचं असेल तर शिक्षका शिवाय पर्याय नाही. असे मत मोहिनीताई सावंत यांनी व्यक्त केले. लता घोलप (सभापती-बांधकाम समिती), निर्मला गायकवाड (सभापती- महिला व बालकल्याण समिती), पूजा इंदलकर (सभापती- आरोग्य व स्वच्छता समिती), विक्रम सिंग परदेशी (सभापती- पाणीपुरवठा व दिवाबत्ती), संदीप कांबळे (नगरसेवक), नगरसेविका स्वाती फंड, सुवर्णा आलाट, अश्विनी अब्दुले, सुनीता ढाणे, चैताली सावंत इ. उपस्थित होते. तसेच सुनील कुमार लुणिया, उमराव मुलाणी, महादेव फंड, विजयकुमार घोलप, तसेच पत्रकार मार्मिक समाचार सागर गायकवाड व संघर्ष न्यूज चॅनल सिद्धार्थ वाघमारे उपस्थित होते. सदर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मुकुंद मुसळे सर, सुरेश कोळी सर,  शिवदास कोकाटे, संतोष माने सर, बाळू दुधे सर, अशोक ढाकणे सर, नवनाथ पारेकर सर, सुनील जाधव सर, रमेश नामदे सर, मोनिका चौधरी मॅडम, तृप्ती बेडकुते मॅडम, बलभीम शिंदे सर व त्यांची सर्व टीम, दिपक जाधव सर, सचिन धायतोंडे सर, जुबेर जनवाडकर सर व सय्यद सर यांनी परिश्रम घेतले. मान्यवरांचे शब्द सुमनांनी स्वागत विक्रम राऊत सर यांनी केले. सूत्रसंचालन संध्या शिंदे मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन दयानंद चौधरी सर यांनी केले. सदर सन्मान सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *