
करमाळा प्रतिनिधी
‘सुदृढ समाज, समृद्ध भविष्य’ आणि ‘समाज हितासाठी सदैव तत्पर’ या ब्रीदवाक्याला अनुसरून श्रीमंत युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आज, बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी घोलप नगर येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत ‘आरोग्य तपासणी शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर आज संध्याकाळी ५.०० ते ९.०० या वेळेत घोलप नगर, करमाळा येथे पार पडणार आहे. वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी, या उद्देशाने प्रतिष्ठानने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.

शिबिरात उपलब्ध असणाऱ्या सेवा
सामान्य तपासणी (General Checkup), रक्तदाब तपासणी (Blood Pressure Checkup), रक्तातील साखर तपासणी (Blood Sugar Test), हृदयविकार तपासणी (Heart Health Checkup), लॅब तपासण्या (गरजेनुसार), तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला
आपले आरोग्य आपल्या हातात असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आजच आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे श्रीमंत युवा प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले आहे.